प्रेमदान चौकात रिक्षाचालकास जब्बार मारहाण
अहमदनगर प्रतिनिधी :- बालिकाश्रम रोड येथे राहणाऱ्या दीपक गुजर या रिक्षा चालकास प्रेमदान चौकात तीन ते चार जणांनी जब्बर मारहाण केली. मागील भांडणाच्या कारणा वरून प्रेमदानचौकातील तोरणा कँटीन समोर दीपक गुजर यांना चार जणांनी लाकडी दांडक्याने, गजाने मारहाण केली.
यात ते जखमी झाले असून पायास दुखापत झाली. याबात त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून रतन गायकवाड, किसन मोरे, बंटी मोरे, सुभाष कांबळे यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस नायक शिंदे करत आहेत.