Breaking News

पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदार संघात रस्त्याची अवस्था बिकट.


सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणाऱ्या शिर्डी हैदराबाद महामार्गावरील जामखेड खर्डा रस्त्याची रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यावर आता मोठ मोठे खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत असुन अनेकवेळा प्रशासनाकडे मागणी करूनसुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्याने आरोप ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदार संघात रस्त्याची खुप अवस्था बिकट झालेली आहे पालक मंत्री राम शिंदे यांचे अधिकारी वर नियंत्रण आहे का नाही असा सवाल नागरिक मधून जोरदार चर्चा सुरू आहे ज्या जामखेड तालुक्यातून जिल्हयाचे पालकमंत्री राम शिंदे यांना नागरिकांनी दोनदा आमदार म्हणून निवडून आणले व दुसऱ्यादा मंत्री झाले तरी त्यांच्या जामखेड तालुक्यात आता सध्याला पुर्ण प्रभारीराज चालू आहे जामखेड ला अधिकारी आला की दोनच महिन्यात बदली होती त्यामुळे कोणाच्या कोणाला ताळमेळ बसत नाही कसे प्रश्न जामखेड तालुक्यात गोरगरीब नागरिकांचे अधिकारी नसल्यावर सुटणार आहे

राष्ट्रीय महामार्ग असलेल्या शिर्डी हैदराबाद महामार्गावरील जामखेड खर्डा - भुम - तुळजापूर या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यावर आता मोठ मोठे खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत आहेत, तसेच खड्ड्यात आदळून वाहनांचेही नुकसान होत आहे. येथून मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे दररोज अनेक वाहने खड्डयात आदळून बंद पडतात.या रस्त्याची दुरावस्था झाली असून गेली अनेक वर्ष या रस्त्याची साधी डागडुजीही झाली नसल्याने रस्त्यावर मोठ-मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

या महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून हा मार्ग सुरक्षीत नसल्याने अपघात होण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांबरोबरच वाहनचलकांतून व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या सुरावातीलाच या रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने व हा खराब रस्ता अपघाती वळणावरच असल्याने येथे मोठा अपघात होऊ शकतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून योग्यती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

आता मोठा अपघात होण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग बघतोय का? असा सवाल स्थानिक करीत आहेत. त्याचबरोबर स्थानिक पुढार्‍यांचे याकडे लक्ष नसून मतदनावेळी आश्‍वासनांची खैरात करणार्‍या राजकीय पुढार्‍यांना या रस्त्याच्या सुरक्षेबाबत विसर पडला की काय? असा प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. शेजारील आंन्दप्रदेश राज्यात जाणार्‍या जनतेसाठी हा जवळचा मार्ग असल्याने याकडे संबधित विभागाने लक्ष देवून रस्तावरील खड्डे तत्काळ बुजरस्ता वाहतुकीस सुरक्षीत करण्याची मागणी स्थानिक करीत आहेत.