Breaking News

मिरजगाव परीसरातील अवैध प्रवासी वाहतुक जोमात", " पोलीस मात्र कोमात !

मिरजगाव दि 14/ वार्ताहर. - कर्जत तालुक्यातील मिरजगाव परीसरातील अवैध प्रवासी वाहतुक मोठ्या प्रमाणावर बोकळली असुन, या सर्व प्रकारामध्ये शालेय विद्यार्थी, विध्यार्थांनीना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, यासर्व गोष्टींकडे पोलीस प्रशासन मात्र जाणुन बुजुन कानाडोळा करत असलेचे दिसत आहे.


नगर सोलापुर महामार्गा वर मिरजगाव परीसरातील खाजगी "अवैध प्रवासी वाहतुक जोमात", " पोलीस मात्र कोमात " अशी अवस्था झाली आहे, यामध्ये शालेय विद्यार्थी यांना आपला जिव मुठीत घेउनच दररोज ये जा करावी लागते, या विध्यार्थांना मेंढरासारखे अक्षरशः कोबंले जात आहे, रस्त्यांच्या कडेला आडवी तिरकी आपले वाहणे लाऊन मनमानी कारभार करत असल्याने या गोष्टीमुळे नागरीकांना चांगलाच मनस्थाप सहन करावा लागत आहे.

मिरजगाव हे महामार्गावर असणारे तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे, त्या. मुळे प्रवाशी वर्गांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने व एस टी बसची वाट पहाणा-या प्रवाश्याशी हुज्जत घालत हे वाहणे अगदी बसस्थानका मध्ये नेऊन प्रवाश्याशी लुट करत आहेत.

त्यामुळे मिरजगाव बसस्थानकामध्ये प्रवाश्यांची वर्दळ कमी प्रमाणावर पहावयास मिळते , त्याच बरोबर बसस्थानका कडुन शाळा, कॉलेजकडे, तर कॉलेज घराकडे मुलींना ये जा करत असतांना या वाहण चालकांकडुन छेडाछेडीच्या घटना अनेक वेळा घडल्याचे अनेकऊदाहरणे आहेत, तरी यासर्व चाललेल्य गोष्टींकडे पोलीसांनी लक्ष द्यावे अशीमागणी होत आहे.