Breaking News

आपल्याला विश्रांती द्यावी अशी विनंती केली होती - हार्दिक पंड्या.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करताना निवड समितीने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला विश्रांती दिल्यामुळे त्याची संघात निवड होऊ शकली नाही. याबद्दल उलटसुलट बातम्या सामाजिक माध्यमातून पसरल्या गेल्या. 


काहींनी संशय व्यक्त केला की, अखेरच्या ट्वेण्टी-२० सामन्यात हार्दिकच्या हाताला दुखापत झाली होती, तर काहींनी सूर आळवला, अश्विन आणि रवींद्र जडेजाप्रमाणेच पंड्याला त्याच्या मनाविरुद्ध विश्रांती दिली जात आहे. पण स्वत: हार्दिकनेच खुलासा केला आहे की, त्यानेच आपल्याला विश्रांती द्यावी अशी विनंती केली होती. श्रीलंकेनंतर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात आहे. त्या मालिकेसाठी तंदुरुस्त राहाण्याच्या उद्देशानेच आणि शरीराला पुरेशी विश्रांती मिळावी म्हणून मी काही काळ थांबायचा निर्णय घेतला आहे.