Breaking News

डीएसकेंविरोधात अडीच हजार गुंतवणूकदारांच्या तक्रारी

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी गुंतवणुकीच्या अमिषाने ठेवीदारांकडून घेतलेले पैसे परत केले नाहीत. फसवणूक झालेल्या अशा गुंतवणूकदारांचा आकडा अडीच हजारांवर गेला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे मंगळवारपर्यंत तब्बल दोन हजार 584 गुंतवणुकदारांनी तक्रार अर्ज भरून दिलेले असून फसवणुकीचा आकडा 160 कोटींपर्यंत पोहोचल्याची माहिती 


आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. डी.एस.कुलकर्णी यांची वेगवेगळया बँकेतील 80 खाती यौलर्वीच आर्थिक गुन्हे शाखेने सील केलेली आहेत. तसेच दुय्यम निंबधक व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून डीएसके समुहाच्या जमीन व्यवहार विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, डीएसके यांनी वकिलांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली व एक आठवडयापुरता दिलासा मिळवत जामीन मिळविला.

मात्र, उच्च न्यायालयाने गुंतवणूकदारांचे पैसे कशाप्रकारे तातडीने परत केले जाणार आहेत याबाबतचे प्रतिज्ञापत्र आठवड्याभरात न्यायालयात सादर करा, असा आदेश दिला आहे.दरम्यान, पुणे आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांच्या कार्यालयावर व निवासस्थानावर छापा टाकून जप्त केलेली महत्त्वपूर्ण कागदपत्रे, हार्डडिस्क यांचे सखोल विश्‍लेषण सुरू केले आहे.