ऊसदर आंदोलन पेटले पोलिसांचा हवेत गोळीबार अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
अहमदनगर/प्रतिनिधी : ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी शेतकर्यांकडून पुकारलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले असून, शेवगावमध्ये आंदोलकांनी जाळपोळ करत आपला रोष व्यक्त केला, तर पोलीसांनी हवेत गोळीबार केल्याचा दावा शेतकर्यांनी केला. यात दोन शेतकरी जखमी झाले आहेत. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधरांचे नळकांडे फोडले.
या गोळीबारात पैठणचे भगवान मापारी आणि बाबूराव तुकळे हे दोन शेतकरी जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. तर गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी केला. राज्य संघटनेचे शेतकरी मागील अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरले होते. ऊसाला 3100 रूपये ही मुख्य मागणी ऊसआंदोलकांनी केली होती.
शेतकरी आक्रमक होताच पोलींसानी आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांडया फोडल्या. पोलिसांनी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रातील अध्यक्ष प्रकाश बालवडकर आणि अमर कदम यांच्यासह दहा ते 15 शेतकरी नेत्यांना बळाचा वापर करून पहाटेच अटक केली. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी जाळपोळ आणि रास्तारोको सुरू केला.
पैठण-शेवगाव रोडवर घोटण, खानापूर, क-हेटाकळी, एरंडगाव, कुडगाव आदी गावांमध्ये रास्ता रोको केला. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुका अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या दोन शेजारच्या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने हे आंदोलन पेटले. खानापूर, घोटण, तळेवाडी, पातेगाव, पाठण येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांचा हा उद्रेक होता. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकरी गंभीर जखमी झालेत.
पोलिसांनी मात्र, गोळीबार केलाच नसल्याचा दावा केला. आंदोलनामुळे प्रभावित झालेल्या 7 गावांमध्ये जिल्हा प्रशासनाने तात्काळ जमावबंदी लागू केली. या पट्ट्यात 4 साखर कारखाने आहेत. मधूकर मुळे यांच्या गंगामाई साखर कारखान्याच्या परिसरात हे आंदोलन पेटले आहे.
दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांनी प्रशासन आणि आंदोलन या दोघांनाही सबुरीने घेण्याचा सल्ला देत, संतप्त आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे आंदोलकांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर दगडफेक करुन काचा फोडल्या. राज्यात अनेक ठिकाणी ऊस दराचे आंदोलन सुरु आहे. पैठण तालुक्यातील पाटेगावातही ऊस दर आंदोलनाने पेट घेतला.
यावेळी शेतकर्यांनी टायर पेटवले. पोलिसांनी शेतकर्यांना आवरण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन हा एल्गार पुकारला आहे. तर सोलापूरमध्येही शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकर्यांनी मंगळवेढा रोडवर माचणूर जवळ रास्तारोको केला, पोलिसांनी आंदोलक कार्यकत्यांनाना ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे शेतकरी आणखीनच पेटले आंदोलन अनियंत्रीत झालं.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं असून, 7 गावांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव आणि पैठणमध्ये ऊसाला 3100 रूपयांचा दर मिळावा यासाठी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. सकाळपासून आंदोलकांनी रस्त्यांवर टायर जाळून आपला रोष व्यक्त केला. तसंच अडवलेल्या वाहनांच्या चाकांची हवाही सोडली.
अन्यथा राज्यभर आंदोलन : तुपकर
ऊसदराचा प्रश्न मार्गी न लागल्यास, राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. शिवाय, आंदोलकांवरील हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देखील तुपकरांनी केली. साखर कारखान्यात काही पोलीस अधिकार्यांचे शेअर असल्याचं शेतकर्यांनी सांगितलं आहे, अशी गंभीर माहिती देत तुपकरांनी या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.
ऊस दराचा प्रश्नांचा चर्चेतून मार्ग काढू : देशमुख
ऊस दर वाढीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून, राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. केंद्र सरकारने मागील वर्षीपेक्षा एफआरपीचा दर 250 रुपयांनी वाढवून दिला आहे. त्यापेक्षा कमी दर देणार्या कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल. ऊस प्रश्नी आक्रमक होऊन हिंसक आंदोलने करण्याऐवजी शेतकरी व शेतकरी संघटनांनी चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
उच्चस्तरीय चौकशी व्हावी : सुनिल तटकरे
शेतकर्यांवर केलेला गोळीबार हा सरकारचा नाकर्तेपणा असून शेतकर्यांवर करण्यात आलेल्या गोळीबारची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज केली. या सरकारला जनतेच्या प्रश्नांचे गांर्भियच कळत नाही. त्यामुळेच सहकारमंत्र्यांना अहमदनगरच्या घटनेचे गांर्भिय राहिलेले नाही, असा आरोप सहकारमंत्र्यांवर करतानाच राज्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न समजून घेवून ते सोडवावेत, असाही सल्ला सुनिल तटकरे यांनी दिला.