पुढचे दोन दिवस थंडीचा कडाका राहणार !
पुणे, दि. 16, नोव्हेंबर - पुणे आणि पिपरी-चिंचवड शहरात थंडी वाढली असून रात्री व पहाटेच्या वेळी गारवा जाणवू लागला आहे. शहरात थंडीचा वाढलेला कडाका पुढील दोन दिवस असाच कायम राहणार आहे.
पुणे शहरात किमान 11.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले, राज्यात सर्वात कमी तापमान हे उस्मानाबाद येथे 11.3 अंश इतके नोंदले गेले.गारठा वाढल्याने थंडीपासून बचावासाठी पहा आणि रात्री उशिरा घराबाहेर पडणार्यांनी स्वेटर, जर्किनचा आधार घेतला आहे. राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला असून हवामान कोरडे असल्याने तापमानात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या संपूर्ण भागात तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागातील तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे.
