चाईल्ड लाईनमुळे 15 वर्षांत 25 हजार बालकांना न्याय
अहमदनगर, दि. 16, नोव्हेंबर - मागील 15 वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत झालेल्या चाईल्ड लाईन उपक्रमाने आजवर 956 बालविवाह रोखले, 1686 बालकामगार मुक्त केले, 1236 भिक्षेकरी बालकांना नवजीवन दिले.याशिवाय लैंगिक शोषणास बळी पडलेल्या 2578, तर अनैतिक मानवी वाहतुकीच्या 611 बलिना मुक्त आणि पुनर्वसित के ले. 4 हजारावर बालकांना वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन,काळजी आणि सौरक्षणाची गरज असलेल्या निराधार 1489 तर विशेष गरज युक्त 2130 बालकांना सुयोग्य संस्थांचा आधार मिळवून दिला.मागील 15 वर्षात सुमारे 25 हजार वंचित बालकांना उपचार-काळजी- संरक्षण आणि भविष्य उपलब्ध करून दिले,अशी माहिती अहमदनगर चाईल्ड लाईनच्या समन्वयक प्राची सोनवणे आणि सहसंचालक हनिफ शेख यांनी दिली.
गेल्या वर्षभरातील आढावा घेतला असता अनेक आव्हानात्मक केसेस चाईल्ड लाईनने हाताळल्या आहेत.यापैकीच एक म्हणजे गेल्या वर्षी एका बेपत्ता पालक यामुळे ही केस अत्यंत बिकट झाली होती. कोवळ्या बालिकेवर झालेला अत्याचार ! या बालिकेच्या आईच्या प्रीयकराकाडूनच झालेला अमानुष बलात्कार यात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या मुलीचा योनीमार्ग पूर्णतः फाटलेला होता.वेळी सदर मुलीवरील अत्याचार आणि त्यातच बेपत्ता पालक यामुळे ही केस अत्यंत बिकट झाली होती. अशा वेळी नगर ते पुणे आणि पुणे ते नगर असा जीवघेणा प्रवास या कळीने केला आणि तब्बल 3 ऑपरेशननंतर ही बालिका सध्या शासकीय बालगृहात निकोप वाढत आहे.बाल विवाह हा सुद्धा एक अभिशाप नगर जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षांपासून लाभला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात बालकमुक्त देहव्यापाराचे उद्दिष्ट चाईल्ड लाईनमुळे सध्या झाले असले तरी वर्ष 2020 पर्यंत संपूर्ण नगर जिल्हा बाल लैंगिक शोषण आणि अनैतिक मानवी वाहतूक मुक्त करण्याची मोहीम चाईल्ड लाईनने हाती घेतल्याचे ही सोनवणे यांनी नमूद केले.हनीफ शेख यांनी सांगितले की,बालकांची काळजी-संरक्षण-सुटका-पुनर्वसन या चौक टीबाहेर जाऊन व्यापक बालहक्क जागरण चाईल्ड लाईनने केले आहे.याव्यतिरिक्त बालकांमध्ये चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल जागृती निर्माण व्हावी आणि गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हेगारांना रोखण्याची क्षमता बालकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी सेमिनार शाळा पातळीवर घेतले जातात.
मुलांच्या पालकांना या कार्यक्रमात समाविष्ट करून घेऊन पालकां मध्येही जनजागृती व्हावी यासाठी चाईल्ड लाईन कार्य करते. अहमदनगर शहरातील विविध झोपडपट्ट्यामध्ये मुलांना एकत्रित करून चाईल्डलाईन अनेक उपक्रम राबवते.अशा प्रकारे गेल्या 14 वर्षापासून प्रामाणिकपणे, अविरतपणे रात्रंदिवस नियोजनपूर्वक काम करून कामाची पावती म्हणून सन 2015-16 मध्ये आय. ओ. एस. 9001-2008 मानांकन मिळवणारी अहमदनगर चाईल्ड लाईन ही भारतातील पहिली व एकमेव चाईल्ड लाईन ठरली , असे सोनवणे म्हणाल्या.2003 पासून चाईल्ड लाईन नगर शहरातील मुख्य लालबत्ती भागात काम करत असून येथील अनेक अल्पवयीन मुलींना या दलदलीतून बाहेर काढले आहे. संपूर्ण अहमदनगर जिल्हा बाल लैंगिक शोषणा तून पूर्णपणे मुक्त झालेला देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.
गेल्या वर्षभरातील आढावा घेतला असता अनेक आव्हानात्मक केसेस चाईल्ड लाईनने हाताळल्या आहेत.यापैकीच एक म्हणजे गेल्या वर्षी एका बेपत्ता पालक यामुळे ही केस अत्यंत बिकट झाली होती. कोवळ्या बालिकेवर झालेला अत्याचार ! या बालिकेच्या आईच्या प्रीयकराकाडूनच झालेला अमानुष बलात्कार यात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या मुलीचा योनीमार्ग पूर्णतः फाटलेला होता.वेळी सदर मुलीवरील अत्याचार आणि त्यातच बेपत्ता पालक यामुळे ही केस अत्यंत बिकट झाली होती. अशा वेळी नगर ते पुणे आणि पुणे ते नगर असा जीवघेणा प्रवास या कळीने केला आणि तब्बल 3 ऑपरेशननंतर ही बालिका सध्या शासकीय बालगृहात निकोप वाढत आहे.बाल विवाह हा सुद्धा एक अभिशाप नगर जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षांपासून लाभला आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी चाईल्ड लाईनकडे धनगर समाजातील एका बालविवाहाची माहिती मिळाली आणि टीम धावतच घटनास्थळी तालुक्याला पोहोचली. ज्या घरी बालविवाह होता ते गावापासून कित्येक मैल लांब होते आणि जाण्यासाठी साधन म्हणजे फक्त गाडी. अशा वेळी मोठ्या हिमतीने टीम ऐन लग्नाच्या मुहूर्ताला घटनास्थळी पोहोचली आणि धनगर समाज गराडा करून टीमभोवती उभा राहिला. अशा वेळी त्या गावकर्यांना समजूत घालून आणि वेळप्रसंगी कायद्याचा धाक दाखवून बालविवाह रोखणे हे एक जिकीरीचे काम होते आणि ते चाईल्ड लाईन टीमने यशस्वीरीत्या पार पाडले. सर्व गावकर्यांची मनधरणी करून त्या मुलीला या मोहजालातून वाचवले आणि दिव्य पार पाडल्याची अनुभूती टीमला आली. या आणि अशा अनेक केसेस चाईल्ड लाईन टीमने पार पाडल्या आहेत.