Breaking News

गुस्ताखियां या चित्रपटामध्ये काम नाही - दीपिका पदुकोण.

दीपिका पदुकोण भन्सालींच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनत असलेल्या गुस्ताखियां या चित्रपटामध्येही काम करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. परंतु खुद्द दीपिकाने या गोष्टीचा इन्कार केला आहे. 


सध्या आपला चित्रपट पद्मावतीच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या दीपिकाला जेव्हा एका मुलाखतीत तू साहिर लुधियानवी व अमृता प्रितम यांच्या बायोपिक असणाऱ्या गुस्ताखियांमध्ये काम करणार आहे का? अशी विचारणा केली असता, दीपिका म्हणाली की, नाही. या वृत्तामध्ये काहीही तथ्य नाही. मी पद्मावतीनंतर केवळ एकमेव विशाल भारद्वाजचा चित्रपट सपना दीदी साइन केला आहे. 

यामध्ये मी इरफान खानबरोबर काम करत आहे. याशिवाय माझ्याकडे अन्य कोणताही चित्रपट नाही.' तसे पाहता भन्सालींचा गुस्ताखियां हा चित्रपट कलाकारांच्या निवडीमुळे गेल्या काही काळापासून चांगलाच चर्चेत आला आहे.