आता बार्बी गर्ल बनून सनी लिऑन चाहत्यांना लुभावणार.
पोर्न स्टारवरून बॉलिवूड अभिनेत्री बनलेली सनी लिऑन आपल्या अभिनयापेक्षा जास्त आपल्या नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध झाली. बेबी डॉल, लैला... यांसारख्या अनेक आयटम नंबर्सने तिने लाखो लोकांवर जादू केली असून, लवकरच तिचे नवे आयटम साँग रिलीज होण्यास तयार आहे.
यावेळेस ती बेबी डॉल नव्हे, तर बार्बी गर्ल बनून चाहत्यांना लुभावण्यास आली आहे. सनी लिऑनचा आगामी चित्रपट तेरा इंतजारचे नवे गाणे बार्बी गर्ल...चा टिझर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये सनी आपल्या सेक्सी अदा दाखविताना दिसून येत आहे.
