अपयश पचवून पुन्हा आत्मविश्वासाने उभे राहण्याची जिद्द विदयार्थ्यांनी जोपासावी.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीतर्फे बालदिनी अशोकभाऊ फिरोदिया जयंती निमित्त गुणवंत विदयार्थी सत्कार सोहळा मा. यशवंतराव गडाख यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते म्हणाले की, सध्याच्या काळात शिक्षण संस्था चालविणे अतिशय अवघड झाले आहे अशा काळात छायाताई फिरोदिया व फिरोदिया परिवाराने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीची केलेली प्रगती व विकास उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मी आलो आहे.या संस्थेचा माजी विदयार्थी म्हणून मला आभिमान असून शालेय काळातील मैत्री चिरकाळ टिकतेच . आज आधुनिक सुविधा , प्रगत तंत्रज्ञान याचा वापर वाढला आहे मात्र त्याचा योग्य वापर करणे आपल्या हातात असून मैत्री व स्नेह जोपासा असा सल्ला त्यांनी दिला.
नापास होण्याला भिऊ नका,कमी मार्क मिळाले म्हणून खचून जाऊ नका,जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पहा. कला व संस्कृती जोपासत विविध क्षेत्रात कार्य करून स्व:ताची ओळख निर्माण करा आसे आवाहन मा. गडाख यांनी विदयार्थ्यांना यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस एन.सी.सी. पथकाद्वारे मा. यशवंतराव गडाख यांना व मान्यवरांना मानवंदना देण्यात आली.तसेच गडाख यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या कार्यवाह छायाताई फिरोदिया , नियामक मंडळाचे सदस्य डॉ जयंत निसळ,मा. प्रसन्न मुथा ,श्रीमती सुनंदाताई भालेराव,श्रीमती आशाताई फिरोदिया,श्री.गौरव मिरीकर,श्री. गौरव फिरोदिया,सौ. कल्याणी फिरोदिया, मीनाताई बोरा,श्यामाताई नवलखा,श्री. हेमंत मुथा,सर्व शाळांचे मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक ,शिक्षक,पालक,विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी केले.संस्कार व संस्कृती जोपासत काळानुसार बदल करून संस्थेची वाटचाल सुरु असून नवनवीन योजना राबवून सतत विदयार्थी हित जोपासले जाते. गुणवंत विदयार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षी अशोकभाऊ फिरोदिया यांच्या जयंती दिनी गुणगौरव सोहळा घेण्यात येतो,यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी,सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभते त्याच बरोबर प्रत्येक उपक्रमास पालकांचे सतत सहकार्य असतेच यापुढेही ते निश्चित लाभेल असा विश्वास छायाताई यांनी व्यक्त केला.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ब्रीव्हेट सायकलिंग इव्हेण्ट आयोजित नगर ते औरंगाबाद ( वाळूंज ) ते पुन्हा नगर २०० किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा गौरव फिरोदिया यांनी यशस्वी केल्याबद्दल त्यांचा मा. गडाख यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी परीचय मुख्याध्यापक उल्हास दुग्गड यांनी करून दिला.यादी वाचन सौ.गंधाली पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश बुरा यांनी केले. तर आभार सौ. कुसुम मावची यांनी मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
