अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने रहीवाशांचे आरोग्य धोक्यात.
अस्वच्छ मैलामिश्रीत व रसायनयुक्त घाणपाणी पिण्याच्या पाईपलाईनमधे येत आहे याबाबत स्थानिक रहीवाशांनी नगरपरिषद प्रशासनास वारंवार सुचित करत तोंडी तक्रारी करुन पाण्याच्या बाबत लक्ष वेधले मात्र येथील गंभीर समस्या ना अधिकाऱ्यांना दिसत आहे ना पदाधिकार्यांना त्यामुळे येथील रहीवाशी आंदोलानाच्या पवित्र्यात आहेत.
भारतनगर वसाहतीच्या संरक्षक भिंतीलगत शेजारच्या शेतातून पाटचारी गेलेली आहे या पाटचारीत शहरातील एका दुधव्यावसायीकाच्या दुधप्लँटमधील रसायनाचे पाणी पाटचारीत सोडले जात आहे याचाही दुष्परिणाम होवून हे रसायनाचे घाणपाणी वसाहतीत असलेल्या पिण्याच्या पाईपलाईन मधे जात आहे या सर्वाचा परिणाम दूषीत व रसायनयुक्त पाण्यात होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
या गंभीर समस्येबाबत नगरपरिषद पाणीपुरवठा व आरोग्य विभाग यांनी त्वरित दखल घेवून लक्ष देत या समस्येचे निराकारण करत नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी त्वरित पाऊले उचलण्याची मागणी स्थानिक रहीवाशांनी केली आहे तसेच पाटचारीत होत असलेले रसायनयुक्त घाणपाणीही संबंधित व्यक्तीस सुचित करुन थांबविण्यात यावे अशी मागणी करुन वसाहतीत अंतर्गत गटारी व सांडपाण्याच्या सुविधा नगरपरिषदेने द्यायला हव्यात अशीही मागणी होते आहे.
