चार वेळा विश्वचषकावर नाव कोरलेल्या इटलीचे विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न उद्ध्वस्त
फुटबॉल विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या विश्वचषक स्पर्धेत आपला संघ नसल्याचे दु:ख अनावर झाल्याने इटलीचा गोलरक्षक गियानलुईगी बफॉनने फुटबॉल खेळातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. सामना आटोपल्यावर आपल्या अश्रूंवर नियंत्रण ठेवत बफॉन म्हणाला, मी इटलीतील सर्व फुटबॉल शौकिनांकडे दिलगिरी व्यक्त करतो.
इटलीच्या पराभवाचे मला मोठेच दु:ख झाले आहे. ३९ वर्षीय बफॉनने १७५ सामन्यांतून इटलीचे प्रतिनिधित्व केले. माझ्या अखेरच्या सामन्यात इटलीला पराभव स्वीकारावा लागल्याची खंत मला कायमची राहील, असे तो म्हणाला. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामने किती अटीतटीचे असतात, याची कल्पना एव्हाना सर्वांना आली असेल. आमच्या लौकिकाला साजेसा खेळ केला नाही, अशी कबुली दिली.
