Breaking News

स्पेनच्या रोफेल नदालची एटीपी फायनल्समधून माघार.

स्पेनच्या रोफेल नदालने एटीपी फायनल्समधून माघार घेतली आहे. डेव्हिड गॉफीनविरुद्ध तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नदालला ७-६(७/५), ६-७(४/७), ६-४ असा पराभव स्वीकारावा लागला. 


सामना गमावल्यावर नदालने सांगितले, शारीरिक तंदुरुस्ती नसल्यामुळेच त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. आपल्या यशस्वी कारकिर्दीत नदालला अद्याप एकदाही एटीपी फायनल्स स्पधेर्ेचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. ही स्पर्धा अव्वल साखळी पद्धतीने खेळली जाते.

सामन्याला सुरुवात झाली, तेव्हा नदाल तंदुरुस्त नाही, असे जाणवले नाही. स्टेडियममधील हजारो टेनिस शौकीन नदालला सातत्याने प्रोत्साहन देत होते. पण सामना अटीतटीचा होत गेला आणि नदालला दुखापतीचा त्रास जाणवू लागला. सामना आटोपल्यावर नदाल म्हणाला, मी स्पर्धेतून माघार घेत आहे. याबरोबरच माझा यंदाचा हंगाम संपला. या स्पर्धेत सहभागी होईन, असे मी संयोजकांना सांगितले होते. मी तंदुरुस्त राहण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण माझी खात्री झाली की मी यापुढे खेळू शकत नाही.