Breaking News

रुग्णालय,शासकीय कार्यालयात वृक्षारोपण मोहीम कुळधरण ग्रामविकास संघटनेचा उपक्रम

 कुळधरण : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या वतीने कुळधरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,मंडल कृषी कार्यालय,पशुवैद्यकीय दवाखाना,तलाठी कार्यालयात तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. 


प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास संघटनेचे मार्गदर्शक शेषेराव सुपेकर तसेच ग्रामविकास संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा व ग्रामपंचायत सदस्या वर्षाराणी बंडू सुपेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन शुभारंभ झाला. 

यावेळी संघटनेचे मार्गदर्शक महादेवआबा सुपेकर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.बी टी सोनवणे,कुळधरण सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बापू तुकाराम सुपेकर,राजश्री चव्हाण मॅडम,सुखदेव पवार,चंद्रकांत भवाळ,तात्या गुंड,हिम्मत गुंड,सिताराम गुंड,आबासाहेब जगताप,आण्णा भानुदास सुपेकर,विठ्ठल थोरात,चांगदेव गजरमल,सचिन गुंड,सुरेश ढवळे,रायचंद थोरात,विनोद सुद्रिक,गुंड मामा आदी उपस्थित होते. कुळधरण ग्रामविकास संघटनेचे सुधीर जगताप, किरण जगताप, बंडू सुपेकर,दिनेश जगताप,आबा माळवे,महेंद्र पोपट खराडे यांच्यासह सागर भदर,सागर सुपेकर आदी कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

सर्व कार्यालयात वृक्ष लागवड पूर्ण करण्यात येणार असुन संघटनेच्या वतीने संगोपन करण्यात येणार आहे.संघटनेच्या वतीने कुळधरणमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असुन ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.