Breaking News

निघोज रामवाडी-कोल्‍हेवाडी येथे अखंड हरिनाम सप्‍ताह

 निघोज वार्ताहर :- पारनेर तालुक्‍यातील रामवाडी कोल्‍हेवाडी येथे वै.प.पु. वंदनीय ब्रम्‍हमुर्ती रामदास बाबा दुसाणे, ह.भ.प.डॉ.सारंग महाराज, ह.भ.प. बबन महाराज पायमोडे यांच्‍या कृपेने अखंड हरिनाम सप्‍ताह ३७ व्‍या वर्षीही आयोजित करण्‍यात आल्‍याची माहिती महादेव उर्फ भाऊसाहेब कान्‍हु कोल्‍हे यांनी दिली. 


सप्‍ताहामध्‍ये दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकडा, सकाळी ज्ञानेश्‍वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ, नंतर श्रीमदभागवत कथा व महाप्रसाद आणि जागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. बुधवार दि.२२ नोव्‍हेंबर पासुन प्रारंभ होणार असून.

सप्‍ताहात ह.भ.प. केशव महाराज जगदाळे, गिरीष महाराज शेंडे, पारस महाराज मुथा, एकनाथ महाराज चत्‍तर, संजय वेळुकर, चंद्रकांत पाटील बेळगावकर, गौरीताई सांगळे, यांची किर्तनसेवा होणार आहे. सप्‍ताहात शिववाडी, खाशाबा, संत सावता, मोरवाडी, श्रीराम, बोदगेवाडी, कन्‍हैया, भजनीमंडळाचा जागर होणार आहे. बुधवार दि. २९ नोव्‍हेंबर रोजी ह.भ.प. अशोक महाराज जाधव यांच्‍य काल्‍याच्‍या किर्तनाने सांगता होणार आहे.