Breaking News

खंडाळ्यात भरला पहिला आठवडे बाजार

अहमदनगर ता. प्रतिनिधी: नगर तालुक्यातील खंडाळा येथे काल नुकताच काल {दि. १४} आठवडे बाजार सुरू करण्यात आला. पहिल्याच दिवशी या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाला. या आठवडे बाजारात दहा ते पंधरा व्यापारी व शेतकर्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला होता. 


खंडाळा परिसरातील शेतकर्यांनी या बाजाराबाबत समाधान व्यक्त केले. या बाजारात नगर येथील मसाले विक्रेते, कोळगाव येथील मिठाई विक्रेते तसेच किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. हा बाजार सुरू करण्यासाठी खंडाळा ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. खंडाळा येथील महिलांना यापूर्वी भाजीपाला खरेदीसाठी वाळकी, नगर, किंवा सारोळा कासार या ठिकाणी जावे लागत होते. 

मात्र आता गावातच बाजार भरु लागल्याने महिलांचा पैसा व वेळ वाचणार आहे. प्रतिक्रिया मागील बाजारपेक्षा या बाजारी चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजार सुरू केल्यानंतर सुरवातीला प्रतिसाद कमी असतो. पण नंतर चांगला प्रतिसाद मिळत असतो. अकोळनेर या ठिकाणी असा अनुभव आला आहे. या बाजारामुळे ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. गोकुळदास चोपडा, मसाला व कडधान्य विक्रेते, नगर.