सर्वात जास्त खुन करणारा पंतप्रधान ही मोदींची खरी ओळख. - कोळसे पाटील.
बी.जी. कोळसे पाटील म्हणाले की, संविधानाची अंमलबजावणी न करण्याची शपथ राजकारण्यांनी घेतली आहे. देशात स्वातंत्र्य विचाराचे तरुण निर्माण झाले पाहिजे. विषारी विचारसरणीचा आदर्श भाजपपुढे आहे. राजकारणात देव, धर्म आनू नये. ही वैचारिक पातळीवरची लढाई आहे. या विषारी विचारसरणीला छेद देण्यासाठी बंधुभावाचा संदेश या ऐक्य परिषदेच्या माध्यमातून दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सावित्री-फातेमा विचार मंचच्या वतीने नगरच्या क्लेरा ब्रुस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेच्या बी.जी. कोळसे पाटील बोलत होते. यावेळी मौलाना खलीलुरहमान सज्जाद नौमानी , जमाअते इस्लामी हिंदचे तौफिक अस्लम खान, मराठा सेवा संघाचे गंगाधर बनबरे, इंजी. विजयकुमार ठुबे, बामसेफचे कुमार काळे, लिंगायत समाजाचे शिवानंद हैबतपुरे, अ.भा. माळी महासंघाचे शंकरराव लिंगे, रामदास महाराज जाधव, सत्यपाल महाराज शिरसोलीकर, कॉ.स्मिता पानसरे, अशोक गुंजाळ, बहिरनाथ वाकळे, अभिजीत वाघ, मौलाना अन्वर नदवी आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
