श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
श्रीगोंदा तालुक्यात कोकणगाव येथे मोहन उर्फ किरण दशरथ भोईटे(वय 45) या तरुण शेतकऱ्याने रविवारी सकाळी स्वतः च्या घरात पत्र्याच्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रीगोंदा पोलिसांनी अकस्मात मृत्यू चा गुन्हा दाखल केला असून प्रेताची उत्तरीय तपासणी करून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या बाबत अधिक माहिती अशी की कोकणगाव येथे मयत मोहन उर्फ किरण दशरथ भोईटे याची शेती आहे . शेती अधिक मोलमजुरी करत उदरनिर्वाह करत होते,त्यास दोन मुले एक मुलगी पत्नी असा परिवार आहे.
शनिवार दि 11 नोव्हेंबर च्या रात्री नेहमी प्रमाणे सायंकाळी जेवण करून झोपी गेले असता, झोपेतून उठून कर्ज कसे फेडायचे ? असे ते रात्रभर बडबडत होते .यामुळे आम्ही पण झोपलो नाही. आणि ते पण झोपले नाही असे त्यांच्या मुलांनी सांगितले.
सकाळी 6 वाजता लहान मुलगा ज्या घरात झोपला होता त्याच घरात मी आता झोपतो. असे म्हणून मोहन भोईटे गेले आणि घरात लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. असे त्यांच्या निकट वर्तीयांनी सांगितले. ज्या घरात मोहन याने फाशी घेतली.

त्या घरात लहान मुलगा झोपला होता. तो सकाळी जागा झाला आणि त्यानेआपल्या वडिलांना फासावर लटकलेले दिसताच हंबरडा फोडला. त्याचा आवाज आला असता सर्व जण धावून आले. आणि फासावरील त्यांचे पार्थीव खाली उतरविले . आणि आढळगाव प्राथमिक रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.