Breaking News

’ऑनर युवर डॉक्टर’ अभियानास पुण्यात प्रारंभ

पुणे, दि. 12, नोव्हेंबर - सेवाभाव, आदर असलेल्या वैद्यकीय व्यवसायाबद्दल समाजाने आपला दृष्टिकोन सकारात्मक करावा यासाठी ’ऑनर युवर डॉक्टर’ या अभियानाला शनिवारी प्रारंभ झाला. बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेत ’डेलक्युअर लाईफ सायन्सेस’ चे व्यवस्थापकीय संचालक पी.के.पाठक यांच्या हस्ते अभियानास प्रारंभ झाला. अनुभव कथन, पोष्टर सादरीकरण, गटचर्चा या माध्यमातून हे अभियान होणार आहे.

पाठक म्हणाले, ’डॉक्टरांवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत. वैद्यकीय व्यवसाय हा जीवनदायी आहे. समाजाची काळजी घेणार्‍या डॉक्टरांबद्दल आपली मानसिकता सकारात्मक असली पाहिजे. ’ऑनर युवर डॉक्टर’ अभियानातून आम्ही वैद्यकीय व्यवसायाची सकारात्मक बाजू समोर आणणार आहोत. 

समाजाने केवळ नकारात्मक बाजू न पाहता, सकारात्मक गोष्टींवर विश्‍वास ठेवला पाहिजे. आरोग्य वाढावे आणि आयुर्मान वाढावे यासाठी कार्यरत वैद्यकीय व्यावसायिकांना समाज घटकांकडून भीती वाटणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे’ असेही ते म्हणाले. ’जे डब्ल्यू मेरियट’ येथे झालेल्या या वैद्यकीय परिषदेला देशातून शेकडो डॉक्टर उपस्थित होते.