गजलच्या प्रसारासाठी शासन आवश्यक ते सहकार्य करणार - विनोद तावडे
नवी मुुंबई, दि. 12, नोव्हेंबर - गजलसाठी या संमेलनात ज्या गोष्टी ठरवाल ती पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य शासनाची राहिल, असे प्रतिपादन सांकृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज वाशी येथे केले. गजल सागर प्रतिष्ठान आयोजित 9 वे अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सिनेदिग्दर्शक राजदत्त, पुष्पाताई सुरेश भट, संमेलनाध्यक्ष मधुसुदन नानीवडेकर, आमदार मंदा म्हात्रे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
तावडे म्हणाले की, गजल मधून वैयक्तीक, विश्वातील दु:ख, वेदना मांडण्याची सुरूवात ख-या अर्थाने मराठी गजल मधून झाली आहे. यातून सामाजिक व वैश्वीक भावना व्यक्त होत असतात. गजलकार सुरेश भट यांच्यासह अन्य लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी गजल साहित्यासाठी अपार मेहनत घेतली आहे. त्याचेच फळ म्हणून आता तरुणांमध्येही गजलचे आकर्षण व प्रेम निर्माण झाले आहे.

राजकुमार बडोले म्हणाले की, गजलांमुळे माणसाच्या अंतकरणापर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे. कवी सुरेश भट यांनी महाराष्ट्राला गजलेची ओळख करून दिली. त्यांनी या गजलां मधून सर्वसामान्यांच्या व्यथा मांडण्याचे कार्य केले. तसेच त्यांनी या वेळी स्वत: रचलेली आम्ही कधी आकाशावर कोरली होती नक्षत्रे ही कविता ऐकवून दाखविली.
नानीवडेकर म्हणाले की, गजल लिहितांना सामाजिक भान असावे. त्यात तटस्थताही असावी तसेच कोणत्याही एखाद्या एकांगी विचारांची ध्वजा खांद्यावर ठेवून अस्सलपणा जपता येणार नाही. गजल लिहिता अकारण अस्वस्थ होऊ नये, तो काळजातला अमृताचा झरा आहे. सभ्यतेच्या मर्यादा ठेवून ती लिहिवी. गजलेवरून वाद उकरून काढणा-या वादंगप्रिय मंडळींपासून दूर राहिले पाहिजे. मराठीत उत्तम गजल लिहिणा-यांची संख्या वाढत आहे, असे ते या वेळी म्हणाले.
राजदत्त म्हणाले की, गजलमुळे मी वयाच्या 86 व्या वर्षी देखील मोकळा श्वास घेऊ शकतो. गजल ही माणसाला संथ करून मनाला समाधान देते. गजलेतूनच सामाजिक व वैचारिक व कार्याचा स्तर वाढत जातो. या गजलला नवीन पिढीने उत्साहाने साथ द्यावी, असे आवाहन राजदत्त यांनी केले.