एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोन महिलांसह तिघांचा जागीच मृत्यू
पुणे, दि. 12, नोव्हेंबर - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कार आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दिवसभरात एक्स्प्रेस वे वरील हा दुसरा अपघात आहे. पहिल्या घटनेत किवळे पुलावर कारने अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला.