पुण्यात ’इन्फिनिथीझम’कडून विश्वशांतीसाठी प्रार्थना
पुणे, दि. 12, नोव्हेंबर - प्रत्येकाच्या जीवनात शांतता, आनंद आणि भरभराट व्हावी, हसतखेळत सुखी जीवनाचा आनंद घेता यावा, यासाठी अध्यात्मिक गुरु महात्रिया यांनी इन्फिनिथीझमचा (अनौनुभूती) मार्ग दाखविला. याच मार्गावर चालत महात्रियायांच्या विचारांचा प्रसार करणार्या पुण्यातील इन्फिनिथीझम ग्रुपच्या वतीने सहाव्या वर्धापनदिनानित्त संभाजी उद्यानात विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले.
इन्फिनिथीझमच्या वतीने सकाळी बालगंधर्व चौकातून संभाजी उद्यानापर्यंत सद्भावना यात्रा काढण्यात आली. यावेळी तुळशीची 111 रोपे, 111 छत्र्या, 111 टोप्या, पुण्यातील विविध शाळा व ग्रंथालयांना महात्रिया यांची ’न पाठवलेले पत्र’ ही पुस्तके देण्यात आली.यावेळी 111 फुगे हवेत सोडण्यात आले. केक कापून आनंदाने एकमेकांना भरवत वर्धापनदिन साजरा झाला. सर्वानी निळे कपडे परिधान केल्याने संभाजी उद्यानाच्या हिरवाईवर निळाई अवतरल्याचे दिसत होते.

जीवनामध्ये सुख, समृद्धी व शांतता सदा टिकुन राहावी म्हणून सगळेच धडपड करत असतात. इन्फिनिटीझम हा एकमेव मार्ग आहे ज्याच्या माध्यमातून मानवामध्ये अफाट इच्छाशक्ती उत्पन्न करते. इन्फिनिटीझममध्ये आम्ही काही महत्वपूर्णअनुभव मांडतो.या सर्व घटकांचा एकंदरीत सर्वांच्या जीवनावर नक्कीच चांगला परिणाम घडून येतो. विशेषतः यामध्ये मुलांसाठी आणि प्रौढांसाठी संरचीत अभ्यास, अध्यात्मिक व निवासी संकलन, प्रवचन या सर्व घटकांचा अभ्यास इन्फिनिटीझममध्ये करण्यात आला आहे. इन्फिनिटीझम आनंदमयी जीवनासाठी एक उत्तम मार्ग आहे, असे इन्फिनिटीझम टीमने सांगितले.