कुर्ल्यामध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, 3 मुलींची सुटका
मुंबई, दि. 16, नोव्हेंबर - कुर्लामधील एका उच्चभ्रू सोसायटीतील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. परिमंडळ 6 च्या पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये 3 मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर 2 दलाल महिलांना अटक करण्यात आली.
कुर्ला नेहरुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कामगारनगरमध्ये एका रो हाऊसमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होते. याबाबतची माहिती परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांना मिळाली. या रॅकेटमधून मोठी आर्थिक उलाढाल होत होती. यावर उमाप यांनी एक विशेष पथक तयार केले. या पथकाने काल संध्याकाळी एका कर्मचार्याला गिर्हाईक बनवून येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पाठवले.त्यानंतर त्याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच पोलीस पथकाने छापा टाक ला.
याप्रकरणी रॅकेट चालविणार्या आरोपी रेखा मोरे आणि अनिता चांदणे या महिलांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नों दवण्यात आला आहे. तसेच काल चेंबूरमधील टिळकनगर येथील नटराज बारवर छापा टाकण्यात आला होता.
