जामखेडमध्ये सेतू सेवाकेंद्राचा एक दिवस बंद
जामखेडचे तहसीलदार विजय भंडारी यांना बंदचे निवेदन देण्यात आले. यावेळी महादेव डुचे, योगेश जायभाय , शिवाजी काळदाते,अफसर शेख ,रोहिदास केकाण ,अमोल थोरात ,मोहळकर मारुती ,गणेश अडसूळ ,प्रदीप गायकवाड ,बांदल ,संदीपान गीते ,सत्यजित भोरे, आरती दीपक देवमाने आदी उपस्थित होते.जामखेड तालुक्यातील सर्व महा ई – सेवा केंद्र संपात शंभर टक्के सहभागी झाले होते.
शासन परिपत्रक क्रमाक आसक २०१७/प्र.क्र.९२ /आपले सरकार दिनांक तेरा दहा दोन हजार सतरा [ १३/१०/२०१७ ] नुसार सी .एस. सी मार्फत संग्राम सेवा केंद्रांना लिंक दिल्या मुळे महाराष्ट्रातील पंचवीस हजार [२५,००० ] महा ई सेवा केंद्रा चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.