शेतकर्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा
औरंगाबाद, दि. 27, नोव्हेंबर - 18 नोव्हेंबर रोजी सिडको येथील संत ज्ञानेश्वर नगरमध्ये पैशाच्या देवाण-घेवाण यावरून आदित्य महाले या 22 वर्षीय शेतकर्याने गळफास घेऊ न आत्महत्या केली होती. आदित्यला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन काळे, अनिस पटेल, भगवान घुगे, मुनेश म्हस्के, राजेश उर्फ सोन्या, पगोड, उदय माकोडे (सर्व राहणार औरंगाबाद) या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत आदित्य याने आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे त्यांनी व्याजासहित आरोपींना परत केले. त्या नंतरही वेळोवेळी दे नाही तर जिवे मशीन आशा धमक्या आरोपीकडून दिल्या जात होत्या. आरोपी मुनेश याने आदित्य यांच्या नावावर असलेल्या कारचे कागदपत्रे घेऊन गेला होता. तर आरोपी राजेशने लॅपटॉप घेऊन गेला होता. याच त्रासाला कंटाळून अदित्यने आत्महत्या केल्याची तक्रार आदित्यच्या पत्नीने दिल्याने सहा जणांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.