दुषित पाण्यामुळेच गॅस्ट्रोची लागण
औरंगाबाद, दि. 16, नोव्हेंबर - छावणी परिसरात दुषित पाण्यामुळे अनेकांना गॅस्ट्रोची लागण झाल्यामुळे सध्या या भागातील पाण्याचे स्त्रोत दुषित असल्याने नागरिकांना तात्काळ शुध्द पाण्याचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
छावणी परिसरात दुषित पाण्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बोलविण्यात आलेल्या आपत्कालीन बैठकीमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते.
छावणी परिसरात दुषित पाण्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बोलविण्यात आलेल्या आपत्कालीन बैठकीमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, छावणी परिसरात या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तात्काळ पाणी शुध्दीकरण मोहिम राबवावी, यापुढे पाणी पुरवठा दुषित होणार नाही याची दक्षता घ्यावी, महत्वाचे म्हणजे नागरिकांना तात्काळ शुध्द पाणी मिळावे यासाठी प्राथमिक स्वरुपात पाणी शुध्द करणा-या ‘मेडिक्लोर’ या औषधाचे घरोघरी वाटप करण्याचे निर्दे शही जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. जिल्हाधिका-यांनी स्टेशन रोड परिसरातील जल वाहिनीची देखील पाहणी केली.