पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी उपोषण
बीड, दि. 16, नोव्हेंबर - प्रभाग 18 या प्रभागात पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी एमआयएमच्या नगरसेवकासह वॉर्डातील नागरिकांनी न.प. क ार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. शहरातील प्रभाग 18 मध्ये पाणी पुरवठा वेळेवर होत नाही.
त्यामुळे या भागातील नागरिकांना इतर ठिकाणावरून पाणी आणावे लागते. तसेच स्वच्छता आणि पथदिवे बाबत नगरपालिका लक्ष देत नाही. नागरी सुविधा पुरवण्याबाबत नगरपालिका वॉर्डाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नगरपालिकेने सर्व वॉर्डांचा समान विकास करावा आणि प्रभाग क्रं 18 मध्ये पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा,
प्रभागातील नाले स्वच्छ करावेत, स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी व पथदिवे बसवण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी एमआयएमच्या नगरसेविका शेख रूक्सानाबी यांच्या प्रभागातील कार्यकर्ते आणि नागरीक नगरपालिका कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्ष णिक केले.