Breaking News

सेव्हन अ साईट फुटबॉल स्पर्धेत सिटी क्लबचा संघ विजयी

अहमदनगर, दि. 08, नोव्हेंबर - सिटी क्लब स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने घआलेल्या सेव्हन अ साईट फुटबॉल टुर्नामेंटमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सिटी क्लब संघाने  पेनल्टीच्या एक गुणावर दणदणीत विजय मिळविला.
न्यु आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानात दोन दिवस रंगलेल्या फुटबॉल सामन्यांचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला.या स्पर्धेत शहरासह उपनगराच्या फुटबॉल  संघांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेवून शानदार खेळाचे प्रदर्शन केले.अंतिम सामना सिटी क्लब विरुध्द शिवाजीयन्स या संघात झाला.या अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघानी 1-1 गोल  केले. पेनल्टीवर सिटी क्लब संघाने 1-0 गुण मिळवत शिवाजीयन्स संघावर विजय मिळविला. अंतिम सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमी व नागरिकांनी मैदानावर गर्दी केली होती. विजयी सिटी क्लब संघास 7 हजाररूपये रोख,चषक व उपविजयी शिवाजीयन्स संघास 3 हजार पाचशे रुपये,चषक असे बक्षिस तन्वीर बागवान व तुकाराम गायकवाड यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आले. तसेच या टुर्नामेंटमधील उत्कृष्ट खेळाडू- आकाश कनोजीया(युनिटी एफ.सी.),उत्कृष्ट डिफेन्स खेळाडू-प्रकाश कनोजीया(शिवाजीयन्स),उत्कृष्ट स्ट्राईकर-पु टिण थापा(सिटी क्लब),उत्कृष्ट गोलरक्षक-हुल नन्नवरे (सिटी क्लब) यांना बक्षिसे देण्यात आली.
तन्वीर बागवान म्हणाले की, पैशाने आरोग्य मिळत नसून ते मैदानावर घाम घालून कमवावे लागते. तणाव दूर करण्यासाठी युवकांना मैदानी खेळाची आवश्यकता आहे. खेळाने  आत्मविश्‍वास बळावतो. तर खेळात झालेल्या पराजयाने अपयश पचवायची शक्ती मिळते. ग्रामीण भागातून अनेक उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू पुढे येत असून त्यांना चालना देण्यासाठी वि विध स्पर्धा व प्रशिक्षण शिबीर घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.