देवरूख लायन्स आय व्हिजन सेंटरला मातृमंदिरकडून सहा लाखांची मदत
रत्नागिरी, दि. 08, नोव्हेंबर - संगमेश्वर तालुक्यातील देवरूख परिसरातील मोतीबिंदू रुग्णांना आता देवरूख लायन्स क्लबतर्फे चालविल्या जाणार्या लायन्स आय व्हिजन सेंटरचा आधार मिळणार आहे. देवरूख येथील मातृमंदिर संस्थेने सेंटरसाठी आपल्या जागेसह सहा लाखांची मदत दिली आहे.
मातृमंदिर संचालित लायन्स आय व्हिजन सेंटर लवकरच सुरू होणार आहे .मातृमंदिरचे अभिजित हेगशेट्ये, आत्माराम मेस्ञी, लायन्स आय व्हिजन सेंटरचे डॉ. शेखर कोवळे, देवरू ख लायन्स क्लब अध्यक्ष नितीन शेडगे, मनोज गोखले, अमित सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. डोळ्यासंबधी सर्व तपासणीची सोय लायन्स आय व्हिजन सेंटरमध्ये केली जाणार आहे. सेंटरतर्फे मोतीबिंदू रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया माफक दरात केल्या जाणार आहेत. दारिद्र्यरेषेखालील रुग्णांसाठी अत्यल्प दरात ही सोय उपलब्ध होणार आहे. आठवड्यातून एक दिवस यासाठी देण्यात येणार आहे. याच जोडीला मधुमेह रुग्णांसाठी तपासणी व मार्गदर्शन होणार आहे. देवरूखमधील मोतीबिंदू रुग्णांना याआधी उपचारासाठी बाहेरगावी जावे लागत होते. आय व्हिजन सेंटरमुळे या रुग्णांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. मातृमंदिर रुग्णालय आवारात लवकरच या सेंटरचे उद्घाटन होणार असल्याची माहिती ला नितिन शेडगे यांनी दिली.