Breaking News

भालेगांव बाजार येथील यात्रा महोत्सवाची सांगता

बुलडाणा, दि. 07, नोव्हेंबर - खामगांव मतदार संघातील भालेगांव बाजार येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही कार्तिक पोर्णिमेनिमित्त श्री विठठ्ल संस्थान यांच्या वतीने भव्य विठठ्ल यात्रा  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि.26 ऑक्टोंबर पासुन सुरु झालेल्या या महोत्सवाची 5 नोव्हेंबर रोजी सांगता झाली. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होउन अनेक  नामवंत भागवताचार्यांचे किर्तन देखील पार पडले. 
विठठ्ल यात्रा महोत्सव व चार्तुमास सांगता महोत्सवानिमित्त रविवार दि.5 नोव्हेंबर रोजी हभप षालीग्राम महाराज सुरळकार भालेगांव यांचे कृश्णजन्माचे किर्तन सकाळी 10 वाजता पार  पडले. दुपारी 1.30 वाजता हभप प्रकाश महाराज मोरखडे भालेगांव आश्रम यांचे कृष्ण लीला व काल्याचे किर्तन होउन महाप्रसादाला प्रारंभ झाला. सायंकाळी 5 वाजता दहिहांडीचा  कार्यक्रम पार पडला.
 माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनीही यात्रा महोत्सवानिमित्त भालेगांव बाजार येथे जाउन विठठ्ल मंदिरात जाउन विठठ्ल-रुख्माईचे मनोभावे दर्शन घेतले व बळीराजाच्या  समृध्दी विठु रायाला साकळे घातले..यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार,कृ.उ.बा.स.सभापती संतोश टाले, पं.स.सदस्य विठठ्ल सोनटक्के, माजी  जि.प.सदस्य सुरेषसिंह तोमर, विजय काटोले, युवक काँग्रेस ब्रिगेडचे अध्यक्ष तुशार चंदेल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थानच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा व उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पहार देउन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विठठ्ल संस्थानचे अध्यक्ष  गुलाबराव हुरसाड, सचिव वासुदेवराव बाळ, दिनकर महाराज बुजाडे, योगेष बाळ, राजाराम आटोळे, मुकींदा महाराज, गजानन बाळ, निवृत्ती मांडवेकर, सुरेश् तिजारे, प्रशांत मामनक ार यांच्यासह अशोकभाउ बोरे, नितेश सपकाळ, संतोष फासे, रोशन बोहरे, गजानन खोंदील, महादेव महाराज बोराडे, सुपडु शाह, बिलाल खॉ पठान, संतोष तांगळे महाराज,  गायनाचार्य साबे महाराज, अशोक बोरे, एकनाथ बाठे, गोविंदा खोंदील यांच्यासह मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाचे सदस्य व गावकरी उपस्थित होते.
यानिमित्त भालेगांव येथे अनेक छोटया-मोठया व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. यामुळे भालेगांव बाजारला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. मंदिराच्या वतीने भाविकांसाठी  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित क ार्यक्रमाला कुंबेफळ, ढोरपगांव, काळेगांव,निपाणा, बोरजवळा,  ज्ञानगंगापुर, पिंपळगाव राजा, जळका भडंग, हिवरा, पोरज, निमकवळा, बोथा फॉरेस्ट आदी भागातील टाळकरी  मंडळींचे सहकार्य लाभले.  कार्यक्रम यषस्वी करण्याकरीता श्री राजे प्रतिश्ठात युवा मंच,षिवषक्ती प्रतिष्ठान, जय सोनाजी दुर्गा मंडळ, श्री शिवाजी गणेश मंडळ, जय मल्हार गणेश  मंडळ, जय संताजी गणेश मंडळ, राणा गणेश मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ व श्री विठठ्ल संस्थान भालेगांव बाजार यांच्यासह समस्त गावकरी मंडळी व सेवाधार्‍यांनी परिश्रम घेतले  होते.