Breaking News

नायगांव खुर्द येथे भगवान बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म या ग्रंथाचा सांगता समारोह संपन्न

बुलडाणा, दि. 07, नोव्हेंबर - समस्त जगाला शांततेचा, सद्भावनेचा, समानतेचा, माणुसकीचा संदेश देणार्‍या तथागत भगवान बुद्धांच्या भगवान बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म या पवित्र  ग्रंथाचा सांगता समारोह ग्राम नायगांव खुर्द येथे दि. 05 नोव्हेंबर 2017 रोजी संपन्न झाला.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या भगवान बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म या ग्रंथाचा पठण सोहळा  भन्ते आनंद यांच्या हस्ते करण्यात आला होता. या ग्रंथाची सांगता समारोह भिमाई,  रमाई महिला मंडळ तसेच भिक्कु संघामार्फत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये भदन्त शिलरत्न,  भदन्त जिवक, भदन्त बुद्धपुत्र तर प्रमुख उपस्थितीमध्ये  सर्वधर्म सामाजिक संघटना महा. राज्य तथा दिव्या फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ काकडे, विनोद खरे, नितीन फुलझाडे, डॉ.आसिफ पठाण, कार्तिक तिडके, विनोद वाकोडे,  विठ्ठल ठेंग हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यावेळी भन्तेजींनी सामुहिक बुद्धवंदना घेतली. यावेळी त्यांनी उपस्थितांना भगवान बुद्धांच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिली.  भगवान बुद्धांच्या धम्माला या जगात कुठेही तोड नसून आपण सर्वांनी त्याचे प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाकरिता बहुसंख्येने गांवकरी मंडळी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन भन्ते आनंद यांनी तर आभार डॉ.आसीफ पठाण यांनी मानले.