Breaking News

पारनेरला सृष्टीमित्र परिवारच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

अहमदनगर, दि. 02,  नोव्हेंबर - येथील सृष्टीमित्र परिवाराचे अध्यक्ष लतिफ़ राजे यांच्या  वाढदिवसानिमित्त पारनेर तालुका पत्रकारसंघ, सामाजिक वनीकरण विभाग व सृष्टीमित्र प रिवार यांच्यासंयुक्त विद्यमाने पारनेर येथील चाटे किड्स स्कुल व इंदिरा गांधी नर्सिंग स्कुल मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. 
यावेळी वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त आबासाहेब मोरे, वनश्री पुरस्कार प्राप्त बाळासाहेब जठार, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, लागवड अधिकारी वाघुळकर, डॉ सादिक राजे,  प्राचार्या सलमा शेख, पत्रकार दत्ता झगडे आदी उपस्थित होते. उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी बोलताना आबासाहेब मोरे म्हणाले कि, शासनाने शेतकर्‍यांना जर कार्बन क्रेडिट दिले तर शेतकरी व पर्यावरण प्रेमी आपल्या जागेत, वनविभागाच्या जागेत वृक्ष लागवड करेल  व त्याचा मोबदला मिळत राहिला तर 100 टक्के वृक्ष संवर्धन करतील. आज लतिफ राजे यांनी साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा करताना विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारेपण केले. यातून  विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण व वृक्षारोपणाची आवड निर्माण होण्यासाठी मदत होईल.
यावेळी विद्यार्थाना वृक्ष भेट देण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे म्हणाले आज मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते मात्र त्याप्रमाणात त्याचे किती संवर्धन होते? हा  संशोधनाचा विषय आहे.  बाळासाहेब जठार यांनी आपले विचार विद्यार्थ्यांपुढे मांडले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी फहाद राजे, अमन राजे, सनवर शेख, बापूसाहेब चौधरी यांनी परिश्रम  घेतले.