Breaking News

घर तेथे शौचालय नव्हे, घर तेथे पूल

अहमदनगर, दि. 02,  नोव्हेंबर - वाढती शिर्डी आणि वाढत्या शिर्डीचा हेवा अनेकांना झाला त्याला साईभक्त सिनेअभिनेते आणि राजकारणी पण अपवाद नाही. मात्र त्याच शिर्डीत  नगरपंचायतीच्या हद्दीमधुन एक ओढा वाहतो त्याच ओढ्यावर वार्ड क्र.11 मध्ये त्यालगत अनेक लोक राहता मात्र एकीकडे शासन घर तेथे शौचालय असा नारा सरकार देत असताना  याठिकाणी मात्र घर तेथे लाकडी व लोखंडी पूल 30 ते 40 हजार रु खर्च करून बांधलेले दिसून येतात पुलाची मालिका असणारे हे उपनगर बघितल्यावर आपण शिर्डीतच आहोत क ा असा प्रश्‍न उभा राहतो त्याठिकाणी राहणार्‍या नागरिकांची सहनशक्ती बघितल्यावर त्यांना नगरपंचायतीने विविध सुविधा पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे
याओढ्यालगत वाढलेले गवत अस्वच्छतेचे साम्राज्य पुलावरून लहानमुल कधी पडेल याची खात्री नाही याची चिंता महिलांना सतावते याठिकाणी राहणारा वर्ग हा गरीब व सामान्य  असून पावसाळा आलाकी वाहणारे पाणी डासांचे साम्राज्य बेंडक्यांचा आवाज होणारा त्रास एक पूल नव्हे तर पुलाची मालिका असणारी ही लोकवस्ती याला टिपू सुलतान नगर नाला  रोड आंबेडकर नगर यानावाने परिसर ओळखला जातो स्वतंत्र्याच्या70वर्षानंतर विविध समस्यांना सामोरे जाणारे नागरिक व महिला बघितल्यानंतर त्रास सहन करण्याची क्षमता किती  मोठी आहे ते याठिकाणी दिसून येते याभागातील नागरिक हुसेन शेख यांनी सांगितले की आज न उद्या आमच्या अडचणी दूर होतील आमच्या जीवनात स्थिरता येईल शासनाच्या  योजनेचा फायदा मिळेल घरकुल व शौचालयाचा प्रश्‍न मार्गी लागेल याअपेक्षेवर अनेक वर्षापासून राहता असल्याचे सांगून पिण्याचे पाणी मिळते मात्र घरात जाताना प्रत्येक नागरिकाला  त्याने बांधलेल्या पुलावरूनच जावे लागते म्हणूनघरतेथे शौचालय ऐवजी घर तेथे पूल असे म्हणण्याची वेळ आली आहे याभागात राहणार्‍या लोकांच्या समस्या शिर्डी नगरपंचायतीने  मार्गी लावाव्यात आमच्या प्रश्‍नात ना.राधाकृष्ण विखे पा. नगराध्यक्षा योगिता शेळके त्यांनी मार्गी लावाव्यात असा याभागात राहणार्‍या नागरिकांची मार्गी आहे.