Breaking News

जॅकलीनने धुडकावून लावली टायगर श्रॉफबरोबर काम करण्याची ऑफर !


सध्या अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही बॉलिवूडमध्ये एका चांगल्या पोझिशनवर आहे, याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे काही कारणच नाही. खासकरून जेव्हा तिला सलमान खानबरोबर रेस-३ मध्ये काम करण्याची संधी मिळाली, तेव्हापासून ती खूप विचारपूर्वक चित्रपट साइन करताना दिसून येत आहे. अलीकडेच जॅकलीनने टायगर श्रॉफबरोबर एका चित्रपटामध्ये काम करण्याची ऑफर धुडकावून लावली आहे. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, एका फिल्म मेकरने आपल्या एका चित्रपटासाठी जॅकलीनशी संपर्क साधला होता. यामध्ये टायगर मुख्य भूमिका साकारणार होता, परंतु जॅकलीनने चित्रपटाची ्क्रिरप्ट न वाचताच ही ऑफर धुडकावून लावली. यापूर्वी जॅकलीनने टायगरबरोबर रेमो डिसूझाच्या ए फ्लाइंग जेटमध्ये काम केले आहे.


परंतु असे असतानाही तिने टायगरबरोबरच्या नव्या चित्रपटाची ऑफर धुडकावून लावली. या वर्षी ए जेंटलमेन व जुडवा-२सारख्या चित्रपटांमध्ये दिसून आलेल्या जॅकलीनजवळ सध्या रेस-३ शिवाय ड्राइव्ह नावाचा एक चित्रपटही आहे. हे दोन्ही चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत.