कपड्यांमुळे चर्चेत आली विद्या बालन.
'तुम्हारी सुलु' या चित्रपटातून नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री विद्या बालनचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. त्यामुळे सध्या विद्या खूप खुश असून ती अलीकडेच पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत डेटवर गेली होती. नेहमीच पतीसोबत साडीमध्ये दिसणाऱ्या विद्याने या वेळी निळ्या रंगाचा कुर्ता आणि त्याच रंगाची प्लाजो परिधान केली होती.
या अवतारामध्ये विद्याचा वेगळाच लूक वाटत होता. सिद्धार्थ आणि विद्या हातात हात घालून बाहेर पडले तेव्हा सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. अनेक दिवसांनंतर सार्वजनिक ठिकाणी विद्या आणि सिद्धार्थ एकत्र दिसले; परंतु यांच्या डेटपेक्षा विद्याच्या कपड्यांमुळेच ती चर्चेत आली. कारण नेहमीच साडीमध्ये दिसणाऱ्या विद्याने यंदा ड्रेस परिधान केला होता.
जितकी सुंदर ती साडीमध्ये दिसते तितकीच सुंदर व ग्लॅमरस ती ड्रेसमध्ये वाटते, हे तिने अलीकडेच सिद्ध केले आहे. तुम्हारी सुलू यामध्ये तिने आरजेची व्यक्तिरेखा साकारली आहे. तिची ही व्यक्तिरेखा सिनेरसिकांना खूप आवडत असून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. आता विद्या आणखी कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येईल, याची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत आहे