चाकूचा धाक दाखवत ठाण्यात तरूणीवर बलात्कार; आरोपीला अटक
ठाणे, दि. 25, नोव्हेंबर - चाकूचा धाक दाखवून एका 22 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. पीडित तरूणी घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी घरात शिरला. यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवत पीडित तरूणीला ठार मारण्याची धमकी दिली व जबरदस्तीने बलात्कार केला. आरोपीचे नाव सुरेश असे आहे.