ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांची परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण
ठाणे, दि. 25, नोव्हेंबर - ठाण्यातील कोलबाड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण केली. कोळी समाज आणि मराठी माणसालाच या भागात मासे विकण्याचा हक्क असल्याचे सांगत मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.
कोलबाड परिसरातील रस्त्यांवर अनेक मच्छी विक्रेते बसतात. या भागात 20 ते 25 मच्छी विक्रेते बसतात. यातील काही मच्छी विक्रेते हे परप्रांतीय आहेत, असा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. ठाणे आणि कोलबाड परिसरात कोळी समाज आहे. परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटवून त्यांना या ठिकाणी मच्छी विकण्यास बसण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणीही मनसे केली आहे.