Breaking News

मेहकर नगर परिषदेत स्व.इंदीराजी गांधी व सरदार पटेल यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 02, नोव्हेंबर - दि.31 ऑक्टोबरला मेहकर  नगर परिषदेच्या वतीने स्व.इंदीराजी गांधी यांची पुण्यतिथी तसेच वल्लभ भाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.  मेहकर नगर परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेहकर नगर परिषदेचे अध्यक्ष कासम भाई गवळी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून म.प्र.काँ.क.चे सरचिट णिस श्यामभाऊ उमाळकर, संजुभाऊ जाधव, कलीम खान, शैलेष बावस्कर हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इंदीराजी गांधी व वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण क रण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास जोशी यांनी केले. या वेळेस आपले मनोगत व्यक्त करताना कासम भाई गवळी यांनी इंदीराजी गांधी यांनी देशासाठी कसे बलीदान दिले.  तसेच त्यांच्या मुलांनी सुध्दा देशासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली. व संपूर्ण गांधी घराणे आज ही देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालत आहे असे सांगितले. तसेच  श्यामभाऊ उमाळकर यांनी सुध्दा इंदीराजी गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना इंदीराजी यांनी   राबविलेली विस कलमी योजना तसेच बँकाचे केलेले राष्ट्रीयकरण या बद्दल मा हिती दिली तसेच वल्लभ भाई पटेल यांच्या जीवन चरित्रावर सुध्दा प्रकाश टाकला. या वेळेस या कार्यक्रमाला नगर सेवक  श्री मो.अलीम ताहेर, पंकज हजारी, ललीत ईन्नानी, निलेश  मानवतकर, अलीयार खान, निलेश सोमण. पिंटु सुजैन, मनोज घोडे, हनिफ गवळी, राजू रिंढे, ओम सौभाग, तौफीक कुरेशी, गायकवाड, मुजिब कुरेशी, हुसेन गवळी उस्मान शहा,  नितीन तुपे, तौफीक खान, शेरु कुरेशी, युनुस खान, फिरोज काजी, युनुस पटेल, अख्तर चौधरी, अजगर टेलर, मुस्तफा खान, मदन चौधरी, तसेच न.प.चे सर्व कर्मचारी वृंदांची  हजेरी होती. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन पंकज हजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेष बावस्कर यांनी केले.