Breaking News

डोंगरखंडाळा येथे उपसा सिंचन तलाव मंजुर करा!

बुलडाणा, दि. 02, नोव्हेंबर - तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या डोंगरखंडाळा येथील दरवर्षी उद्भवणारी तीव्र पाणी टंचाई व परिसरातील एक हजार शेती क्षेत्र  सिंचणाखाली येण्यासाठी अत्यंत महत्वपुर्ण ठरणार्‍या येथील उपसासिंचन तलावास शासनाने मान्यता देण्याबरोबरच गावातील अंतर्गत रस्त्यांच्या सिमेंट काँक्रेट बांधकामासाठी जिल्हा  नियोजन समितीमधून 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी डोंगरखंडाळा ग्रा.पं.सरपंच आणि सदस्यांना राज्याचे कृषीमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडक र यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
डोंगरखंडाळा येथे दरवर्षी पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण होते. या काळात गावात टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. गावाला कायमस्वरुपी पाणी टंचाईतून मुक्त क रण्यासाठी डोंगरखंडाळा येथे उफसासिंचन तलावाची आवश्यकता असल्याची बाब ग्रा.पं. ने पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. सिंचन तलावासाठी गावात शासकिय जमीन उपलब्ध  असून कोणाचेही दानपत्र घेण्याची आवश्यकता नाही. डोंगरखंडाळा येथील शासनाने उपसा सिंचन तलाव मंजूर केल्यास गावातील पिण्याच्या पण्याची समस्या सुटेल, त्याचबरोबर डों गरखंडाळा व बोराळा परिसरातील एक हजार हेक्टर शेतजमीन ओलीतीखाली येईल. याकडे देखिल ग्रा.पं. पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे लक्ष वेधून शेतक र्‍यांचे आर्थिक समृद्धी व पिण्याच्या पाण्यासाठी या प्रस्तावाला शासनाने मंजुरी द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
सिमेंट काँक्रेट रस्त्यासाठी 25 लाख निधीची मागणी
डोंगरखंडाळा हे 12 हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाच्या रस्त्याच्या कामासाठी यापुर्वी बुलडाणा अर्बन संस्थेने दिड कोटी रुपयांचा निधी दिला असता यातून बरेच कामे पुर्णत्वास  आली. मात्र आजही गावातील (अंतर्गत) काही रस्ते अत्यंत कच्चे व खराब नादुस्त असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सदर रस्त्यांची सिमेंट काँक्रेटिकरण होणे  आवश्यक असून रस्त्यांच्या या बांधकामासाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीमधून 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी ग्रा.पं.डोंगरखंडाळा यांच्या वतीने स्वतंत्र  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डोंगरखंडाळा ग्रामपंच्यायतीच्या सरपंच व पदाधिकार्‍यांनी दिलेल्या निवेदनाचा स्विकार करुण या संदर्भात आपण शासन दरबारी लक्ष घालणार असल्याचे पालकमंत्री फुंडकर यांनी सां गिले. यावेळी स्थानीक सहकार विद्यामंदिर येथे बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष भाईजी राधेश्याम चांडक, यांच्या उपस्थितीत ग्रा.पं. पदाधिकारी सर्वश्री किशोर चांडक,  अशोक सावळे, महेश सावळे, भिमराव वानखेडे, कोंडू चव्हाण, गोटू उजेड, आसिफभाई कलाल, दिपक भगत, उत्तम बुरकुल, राजू बरडे, मुन्ना सावळे आदींनी पालकमंत्री यांची भेट  घेवून निवेदन सादर केले.