Breaking News

प्राचार्यांच्या कष्टामुळेच न्यू आर्टस महाराष्ट्रात प्रथम- राठोड

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - कॉलेज उभारुन सुरुवात करणे हे सोपे असते पण कॉलेजला विद्यार्थीप्रिय कॉलेज बनवण्यासाठी प्राचार्य, प्राध्यापक, संचालक मंडळ यांना मोठया  प्रमाणावर  बांधणी करावी लागते, अहोरात्र कष्ट करावे लागतात. आपल्या न्यू  आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नॅक बेंगलोर या स्वायत्त  संस्थडून सर्वोच्य अ++ श्रेणी प्राप्त करुन 4 पैकी 3.79  गुण मिळवून आपल्या नगर शहराचे नाव उंचावले. प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे यांच्या कष्टामुळे न्यू आर्टस कॉलेज महाराष्ट्रात  प्रथम व देशात चौथे स्थान प्राप्त केले असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
नगर शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजने नॅक बेंगलोर या  स्वायत्त संस्थेकडून सर्वोच्य अ++ श्रेणी प्राप्त करुन महाराष्ट्रात प्रथम व देशात चौथे स्थान  मिळवल्याबद्दल प्राचार्य डॉ. बी.एच.झावरे यांचा सत्कार शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  नगरसेवक विक्रम राठोड, दिगंबर ध्वण, भगवान  फुलसौंदर, दत्ता मुदगल, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, राजेंद्र दळवी, डॉ. मगेश वाघमारे व कॉलेजचे प्राध्यापक व सहकारी उपस्थित होते.
आज हा क्षण आमच्या कॉलेजच्या व नगरकरांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्रात प्रथम देशात चौथे स्थान मिळवण्यासाठी कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांचा मोलाचा वाटा आहे,  त्यांचे ही अफाट कष्ट आहे.  विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण देण्यासाठी कॉलेज नेहमी सज्ज असेल असे मनोगत प्राचार्य .झावरे यांनी व्यक्त केले.