Breaking News

महाराष्ट्र राज्य युवक परिषदेची स्थापना

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - युवक देशाचा मुख घटक आहे. युवकांचा माध्यमातून देश प्रगती करत असतो पण आज युवकांना विविध क्षेत्रात अडचणी निर्माण झाल्याने तो  होरपळून जात आहे. युवकांना जर त्यांचा भविष्यासाठी योग्य शिक्षण, रोजगार, नोकरी, मिळाली नाही तर तो युवक वर्ग चुकीच्या मार्गाला वळतो आणि गुन्हेगारी वाढते.काही युवकांना  शिक्षणाला पैसा नाही. यासाठी युवकांच्या न्याय हक्कासाठी अहमदनगर शहरामध्ये महाराष्ट्र राज्य युवक परिषदची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती   संस्थापक अध्यक्ष डॉ.  संतोष साळवे यांनी दिली. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ.संतोष साळवे यांनी विशाल लोळगे यांना  जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र दिले. तसेच शहर जिल्हाध्यक्ष भरत अळकुटे,  शहराध्यक्ष महेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष केदार पवार, जिल्हाकार्यध्यक्ष विकी गायकवाड, जिल्हा सचिव शेखर चावरीया, शहर जिल्हा सचिव अनिल दामले, शहर सचिव सचिन  गोरे, जिल्हा सरचिटणीस अँड.संदिप बुरके,शहर उपाध्यक्ष कुणाल बडे,शहर कार्याध्यक्ष विकी हिरणवाळे,विभागप्रमुख केडगांव सुनिल टेके यांनाही नियुक्त करण्यात आले. शाळांमध्ये,क ॉलेजमध्ये किवा नोकरीमध्ये  कोणत्याही ठिकाणी युवकाला अडचण असेल त्या युवकांनी महाराष्ट्र राज्य युवक परिषदशी संपर्क करावा आणि आपल्या अडचणी सोडवण्यासाठी  100% आम्ही प्रयत्नशील असू. असे आवाहन  लोळगे यांनी  केले.