Breaking News

जीएसटी, नोटा बंदीवर उद्धव व ममता यांच्यात झाली चर्चा

मुंबई, दि. 03, ऑक्टोबर - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात जीएसटी व नोटा बंदीच्या मुद्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती  ठाकरे यांनी पत्रकारांना दिली.
ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारच्या राजकीय मुद्यांवर चर्चा झाली नाही. मात्र जीएसटी व नोटा बंदीच्या मुद्यावर आमची व ममता बॅनर्जी यांचे विचार  एकसारखेच आहेत. या बरोबरच मुंबई व कोलकाता शहरांत संयुक्तरित्या विकास करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले. ममता बॅनर्जी मुंबई दौ-यावर असून  आज त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.