Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी करणार ’हल्लाबोल’

सोलापूर, दि. 26, नोव्हेंबर - सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 30 नोव्हेंबर पूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर तर 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


याशिवाय ते 12 डिसेंबर या कालावधीत खासदार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ ते नागपूर पायी दिंडी काढण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन साळुंखे-पाटील यांनी केले.

जिल्ह्यात होणार्‍या हल्लाबोल आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे - पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस खासदार विजयसिंह मोहिते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, कार्याध्यक्ष बळीराम साठे, जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, महिलाध्यक्षा मंदा काळे आदी उपस्थित होते. 

केंद्र राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नोटाबंदी मिळालेली कर्जमाफी ही त्याची उदाहरणे असून सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्यातील जनता त्रासली आहे. जनतेला न्याय देण्यासाठी तालुका जिल्हास्तरावर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.