Breaking News

'त्या' नेत्यांना पापाचे मोल चुकवावे लागेल - मुख्यमंत्री फडणवीस.

सांगली, दि. 26, नोव्हेंबर - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहकुटुंब तेजस्वीपणे लढा दिलेल्या व संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी वर्गासाठी जगलेल्या पद्मभूषण क्रां तिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या सहकारी साखर कारखान्यास यापूर्वीच मंजूर झालेला इथेनॉल प्रकल्प रद्द करण्याचे पाप तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सत्ता कालावधीत झाले. मात्र त्या नेत्यांना या पापाचे मोल आगामी कालावधीत निश्‍चितपणे चुकवावे लागेल, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला.


वाळवा तालुक्यातील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचा प्रतिदिन 30 हजार लिटर क्षमतेच्या 40 कोटी रूपये खर्चाचा इथेनॉल प्रकल्प व हुतात्मा उद्योग व शिक्षण समूह व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्यावतीने आयोजित 44 व्या राज्यस्तरिय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते क रण्यात आले. त्यावेळी हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित जाहीर सभेत फडणवीस बोलत होते. तत्पूर्वी कार्यक्रम स्थळावरील नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या कुटुंबाने सर्वस्व अर्पण केले, त्या नागनाथअण्णा नायकवडी यांच्या या क्रांतीला भूमीला आपण प्रणाम करतो. त्यांच्या स्मारकाला आज अभिवादन क रण्याची संधी आपणाला मिळाली, हे आपले मोठे भाग्य आहे. त्यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन मिळालेल्या तेजातून देशभक्तीची व वंचित घटकासाठी अहोरात्र कष्ट घेण्याची प्रेरणा आपणास मिळाली आहे. 

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागनाथ अण्णा नायकवडी यांनी वाळवा तालुक्यात स्वातंत्र्य लढा उभारला. ज्यावेळी देश पारतंत्र्यात होता, त्यावेळी या भागातील 150 हून अधिक गावे स्वातंत्र्यात होती. या गावात स्वकियांचे सरकार होते. स्वातंत्र्यापूर्वीच प्रतिसरकारची स्थापना करून मूल्याधिष्ठीत समाजकारणाचा विडा उचलला. स्वातंत्र्यानंतरही याच तत्त्वाने त्यांनी समाजकारण केले. स्वतः स्थापन केलेल्या साखर कारखान्याच्या उभारणीनंतर त्यांनी एकदाही त्या साखर कारखान्यात प्रवेश केला नाही.