Breaking News

बेल्जिअमच्या राजा-राणीने ओव्हल मैदानावर लुटला क्रिकेटचा आनंद

मुंबई, दि. 11, नोव्हेंबर -  बेल्जिअमचे राजा फिलीप व राणी माथिल्डे यांनी मुंबईतील ओव्हल मैदानावर आज क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. या वेळी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हेही उपस्थित होते.
राणी माथिल्डे यांनी फलंदाजी व गोलंदाजीही केली. युनिसेफतर्फे लहान मुलांसाठी आयोजित क्रिकेट सामन्याला राजा-राणी यांनी हजेरी लावली. या वेळी वीरेंद्र सेहवाग यांनी राज फिलीप यांना क्रिकेटमधील काही कानमंत्र दिले. बेल्जिअमचे राजा-राणी सध्या सात दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. या निमित्ताने मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करा, मुलींचे विवाह लवकर करून देण्याऐवजी त्यांना शिक्षण द्या, खेळू द्या, असे आवाहनही सेहवागने देशवासियांना केले.