Breaking News

आजपासून रंगणार महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा

57 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा;14 नाट्यप्रयोगांचा समावेश

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणारी आणि नाट्य क्षेत्रातील कलावंतांची प्रतिष्ठेची समजली जाणारी राज्य  नाट्य स्पर्धेस आजपासून नगरमध्ये  प्रारंभ होत आहे.ही  स्पर्धा 20 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून  यात 14  नाट्य प्रयोग होणार आहेत. हे स्पर्धेचे 57  वे वर्ष आहे.गेली 56 वर्ष  सातत्याने या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यामधून अनेक नाटककार,अभिनेते,तंत्रज्ञ्, व दिग्दर्शक निर्माण झाले . सदर स्पर्धा  अहमदनगर केंद्रावर  सावेडी येथील माऊली  सांस्कृतिक सभागृहात पार पडणार आहेत.या नाट्य स्पर्धा नाट्यप्रेमींसाठी मोठे व्यासपीठ ठरत असून या नाट्यस्पर्धेनमधून ग्रामीण तसेच शहरी भागातील बाल व युवा कलाकारांना  व्यासपीठ उपलबध होऊन करिअर घडवण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे.
या स्पर्धेचे उदघाटन आज सायंकाळी महापौर सुरेखाताई कदम,अखिल भारतीय महाराष्ट्र नाट्य परिषदेचे अध्यक्ष क्षितिज झावरे आदींच्या हस्ते उदघाटन होणार आहे.या स्पर्धेच्या  समन्वयकपदी सागर मेहेत्रे असणार आहेत.