Breaking News

जी.एस.टी. कायद्यात जाचक तरतुदी

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - वस्तू व सेवाकर (जी.एस.टी.) कायद्याची अंमलबजावणी करताना व्यापारी वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कायद्यामध्ये अनेक  किचकट त्रुटी असून त्यामुळे कामामध्ये अनेक विघ्न येत आहेत अशा भावना व्यक्त करत आपल्या तक्रारींचे निवेदन सर्व व्यापार्‍यांच्या वतीने जिल्हा कर सल्लागार संघटनेने  अहमदनगर येथील राज्य कर उपायुक्त आर. पी. राऊत यांना आज दिले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष मालपाणी, अ‍ॅड. गुजराथी, संजीव गांधी,कुलकर्णी, लोखंडे, सुनील कराळे, प्रसाद  किंबहुने, सारंग गांधी, यांच्या समवेत मोठ्या संख्येने कर सल्लागार उपस्थित होते. वस्तू व सेवाकर (जी. एस. टी.) कायद्यामध्ये न समजणार्‍या अनेक गोष्टी असून किचकट त्रुटी  आहेत. त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी याचे  संपूर्ण गायडन्स नाही.
या कायद्याची अंबलबजावणी करताना व्यापार्‍यांना नाहक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.यासाठी व्यापार्‍यांच्या भावना आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी  संघटनेच्या वतीने राऊत यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राऊत यांनी यावर कारवाई करून सरकारपर्यंत मागण्या पोहोचविण्याचे आश्‍वासन दिले.