Breaking News

जळगावात महिला क्रिकेट निवड चाचणी उत्साहात

जळगाव, दि. 08, नोव्हेंबर - सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयातर्फे विभागांतर्गत महिला क्रिकेट निवड चाचणी मू. जे. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर झाली. स्पर्धेत 15 महा विद्यालयांतील 50 महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन ऐनपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या हस्ते करण्यात आले. महिला निवड चाचणीस प्रा. स चिन झोपे, प्रा. किरण नेहेते, प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, प्रा. डॉ. आनंद उपाध्याय, प्रा. डॉ. नवनीत आसी यांनी सहकार्य केले.
या वेळी प्रा. डॉ. अनिता कोल्हे, प्रा. मुकेश पवार, प्रा. वाय. डी. देसले, प्रा. विकास महाजन, प्रा. योगेश जोशी, प्रा. योगेश महाजन, प्रा. नितीन चौधरी, प्रा. प्रवीण कोळी, प्रा. नी लिमा पाटील, प्रा. स्नेहल राऊत, सतनामसिंग बावरी उपस्थित होते. प्रा. डॉ. पी. आर. चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.