महाजन यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून निषेध
जळगाव, दि. 08, नोव्हेंबर - राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे साखर कारखान्याच्या गाळप प्रसंगी सभेत केलेल्या वक्तव्याचा निषेध राष्ट ्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकार्यांनी त्यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयासमोर केला. या ळी जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील , माजी नगराध्यक्ष प्रतिभा शिरसाठ , मीनल पाटील , वंदना राजपूत , वैशाली पाटील, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.